Ad will apear here
Next
‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम
रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आठ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दीपोत्सव व ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेल्या मोजक्या गीतांच्या मैफलीने या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.  

ही मैफल सुप्रसिद्ध गायक राजाभाऊ शेंबेकर, गायिका आदिती करंबेळकर, तबला वादक गिरीधर कुलकर्णी आणि संवादिनी वादक हर्षल काटदरे रंगवणार आहेत. त्यानंतर पुणे येथील आशय सांस्कृतिक संस्थेच्या सौजन्याने सुधीर मोघे यांनी दिग्दर्शित केलेला ‘या सम हा’ हा लघुपट रसिकांना दाखवण्यात येणार आहे.

आर्ट सर्कलने ‘पुलं’च्या जन्मशताब्दी कार्यक्रमांचे नियोजन जूनपासून केले आहे. वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होणार आहे. ‘पुलं’ ‘रत्नागिरीचे जावईबापू असल्याने ‘पुलं’ व सुनीताबाई या दोघांचे आपण देणे लागतो या भावनेतून जन्मशताब्दी वर्ष दिमाखात साजरे होणार आहे. आशय सांस्कृतिक संस्थेच्या सहयोगाने येथे गेली दहा वर्षे ‘पुलोत्सव’ साजरा होतो. त्या व्यतिरिक्त ‘पुलं’च्या विविध पैलूंना स्पर्श करणारे उपक्रम आर्ट सर्कल आयोजित करणार आहे.

‘पुलं’ आणि सुनीताबाईंनी आपल्या वागणुकीतून नात्यांचे नि नैतिक मूल्यांचे आदर्श घालून दिले. दीपोत्सवामध्ये रत्नागिरीकर, रसिक, साहित्यप्रेमींनी भाग घेऊन एक पणती लावून या दांपत्याला सलाम करावा, अशी भावना आहे. पुलोत्सवामध्ये सामाजिक कृतज्ञता सन्मान दिला जातो. यासाठी रसिकांनीही ओवाळणी देण्याचे आवाहन आर्ट सर्कलतर्फे करण्यात आले आहे. ओवाळणीत मिळालेल्या रकमेचे वाटप गेल्या दहा वर्षांतल्या सामाजिक कृतज्ञता सन्मान दिलेल्या संस्थांमध्ये समान केले जाणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
आठ नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर, रत्नागिरी.

(पु. ल. देशपांडे यांच्यासंदर्भातील विविध साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIBBT
Similar Posts
प्रियांका बर्वे पुलोत्सव तरुणाई पुरस्काराची मानकरी रत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या सासुरवाडीत म्हणजेच रत्नागिरीत ‘आर्ट सर्कल’तर्फे होणारा पुलोत्सव यंदा ‘पुलं’च्या जन्मशताब्दीमुळे अधिक उत्साहाने होणार आहे. सात ते नऊ डिसेंबर २०१८ या कालावधीत हा उत्सव रंगणार आहे. यंदाचा पुलोत्सव सन्मान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना, तर पुलोत्सव तरुणाई पुरस्कार
‘पुलं’च्या व्यक्तिरेखा भेटणार ‘पुलकित रेषां’मधून... रत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय
‘पुलं’ची शब्दकळा समाजजीवनाचे मर्म टिपणारी रत्नागिरी : ‘पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनात समाजजीवनाचे मर्म टिपले आणि नुसते सांगण्यापेक्षा काही तरी करून सांगावे अशी त्यांची शब्दकळा होती. ‘परफॉर्मन्स स्किल’ हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव होता. तो मला भावला. त्यांच्या अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेमुळेच ज्यांना त्यांच्या आवाजाची सवय आहे, त्यांना
‘पुलं’ स्मृतिदिनी ‘या सम हा’ विशेष कार्यक्रम पुणे : आठ नोव्हेंबर २०१८ ते आठ नोव्हेंबर २०१९ हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने आणि स्क्वेअर वन यांच्या सहयोगाने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुमारे २५ शहरांत आणि भारताबाहेरील पाच खंडातील सुमारे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language